जेसन मोमोआ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. अॅक्वामॅन या सुपरहिरोपटामुळे नावारुपास आलेला जेसन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
परंतु आज यशाच्या शिखरावर असलेला हा अभिनेता काही वर्षांपूर्वी चक्क दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होता. केवळ ब्रेड आणि मीठ खाऊन दिवस काढणाऱ्या जेसनने करिअरमधील एक चकित करणारा अनुभव सांगितला.
जेसनने आपल्या करिअरवर भाष्य केलं. तो म्हणाला, “मी करिअरच्या सुरुवातीच्या काळात काही रात्र पाहिल्या आहेत ज्यावेळी आम्ही केवळ ब्रेड आणि मीठ खाल्लं आहे. पण माझा धीर खचला नाही. मी प्रयत्न सुरु ठेवले. ऑडिशन दिली अन् आज माझ्याकडे बिग बजेट प्रोजेक्ट आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात माझ्याकडे खर्चासाठी सुद्धा कमीत कमी पैसे असायचे.”