इंदापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
निमसाखर – जनावरांना ओल्या चाऱ्याच्या नावाखाली फक्त वाळका 265 ऊस दिला जात असून जनावरांना पिण्यासाठी योग्य पाणीही दिले जात नाही. काही ठिकाणी जनावरांच्या सावलीची सोय देखील शेतकरीच स्वतःच्या खर्चाने करत होते. अशी परिस्थिती इंदापुरातील चारा छावण्यांमय पाहायला मिळाली.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ठिकठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांना शिवसेनेच्या तालुका शिष्टमंडळाने भेट देऊन शेतकऱ्यांची जास्तीत जास्त जनावरे नोंदी बंद न करता सुरु ठेवण्याचे आवाहन यावेळी सेनेचे तालुका संघटक ऍड. नितीन कदम यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांना व जनावरांना कोणताही त्रास न देण्याची तंबी शिष्टमंडळाने दिली. अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांची यापुढे कोणतीही तक्रार येणार नसल्याचे आश्वासन दिले.
इंदापूर तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने इंदापूर तालुक्यातील चारा छावण्यांना भेट देऊन पाहणी केली. सुरुवातीला कर्मयोगी कारखान्याला भेट देत नंतर नीरा भीमा कारखाना व निरवांगी येथील सोनाई या ठिकाणच्या छावण्यांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या अडचणी यावेळी जाणून घेतल्या. ठिकठिकाणच्या चारा छावण्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी शिष्टमंडळास सांगितल्या. पाहणी दरम्यान शिष्टमंडळाला सदर शिष्ठमंडळात शिवसेना तालुका संघटक ऍड. नितीन कदम, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी सुदर्शन रणवरे, तालुका युवाधिकारी संदिप चौधरी, शेटफळ हवेलीचे शिवसेना शाखाप्रमुख नितीन शिंदे, युवासेना प्रसिद्धी अधिकारी चिन्मय कुलकर्णी उपस्थित होते. लवकरच शिवसेनेच्या वतीनेही शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.