कोल्हापूर – खाजगीकरणांतर्गत “बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर करण्यात येणारे कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामास गती द्यावी. शासनाची मान्यता घेऊन संबंधीत रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. या रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार संबंधित रस्त्याची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाले असल्याने हे काम केंद्र शासनास हस्तांतरित करण्यात आले होते. हस्तांतरीत लांबीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग कॉंक्रीटीकरणाचे व सुधारण्याची कामे प्रगतीत असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित पुढील रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातील कामासाठी शासनाची तातडीने मान्यता घेऊन धोरण ठरविण्यात यावे. व या कामास गती द्यावी असे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.