न्यायालयीन कामाला मिळणार गती; सोमवारपासून दोन सत्रांमध्ये कामकाज सुरू

पुणे – करोना संसर्गामुळे मार्चपासून बंद असलेले शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून (दि.11) दोन सत्रात सुरू होणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजास गती मिळणार आहे.

वकील, पक्षकारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. पूर्ण क्षमतेने न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहणार आहे. मात्र, सर्वांना करोनापासून बचावासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत न्यायालयीन कामकाज सुरू आहे. मात्र, ते दोन सत्रामध्ये सुरू करण्यची मागणी वकिलांकडून करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळी अकरा ते दुपारी दीड आणि दुपारी अडीच ते साडेचार अशा अडीच तासांच्या दोन सत्रांमध्ये न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. पहिल्या सत्रात प्राधान्याने पुराव्यासाठी लागलेल्या केसेस, दुसऱ्या सत्रात युक्तीवाद ऐकणे, निकाल आणि आदेश पारीत केले जाणर अहेत.

ज्या, त्या दिवशी असलेल्या कामकाजाची यादी लावण्यात येणार आहे. सुनावणी असलेल्या पक्षकारांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. वकील अथवा पक्षकार गैरहजर असल्यास, त्यांच्याविरोधात आदेश पारीत करण्यात येणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.