पुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा वेगाने कारवाई सुरू केली आहे.
मंगळवारी, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमधील बीडीपी आरक्षित जागेतील बांधकामांसह घोरपडी भागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
वडगाव बुद्रुकमधील स.नं. 45 मधील 2 बहुमजली इमारतींचे सुमारे 16 हजार चौरस फूटांचे आरसीसी बांधकाम पाडले.
तर घोरपडीमधील स.नं. 60, 61, बीटी कवडे रस्ता, मुंढवा धायरकर वस्ती, घोरपडी रेल्वे क्रॉसिंग या भागातील सुमारे 10 हजार चौरसफूटाहून अधिकची बांधकामे जमीनदोस्त केली.