पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती

पुणे – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या कामाने गती घेतली आहे. हा रेल्वे मार्ग जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यांतून जाणार आहे. हवेली तालुक्‍यातील 12पैकी सात गावांमधील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जाहीर केला आहे. यामुळे प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे.

पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यांतून रेल्वेमार्गासाठी 575 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादनासाठी 1300 ते 1500 कोटी रुपयांचा निधीची आवश्‍यकता आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार आहे.

सद्य:स्थितीत हवेलीमधील हडपसर, मांजरी खुर्द, मांजरी बु., कोलवडी,साष्टे, बकोरी, वाडेबोल्हाई, तुळापूर, लोणीकंद, केसनंद, पेरणे, बावडी या गावांमधून रेल्वे मार्ग जाणार आहे.

यातील कोलवडी, साष्टी, मांजरी खुर्द, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई आणि बावडी या गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गासाठी या 12 गावांमधील सुमारे 131 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.