पवनानगर – पवन मावळ भागात गहु, हरबरा फरसबी खुरपणीच्या कामाला वेग आला आहे. यासाठी सायकल या आधुनिक यंत्राचा अधिक वापर होत आहे.
पवनमावळ परिसरातील विविध गावांमधील शेतकरी वर्ग शेतीची कामे करण्यात मग्न दिसून येत आहे. सध्या या परिसरात गहू, हरभरा, फरसबी ही पिके चांगल्या स्वरुपात आली असून, त्यांची खुरपणी करणे सुरू आहे; परंतु सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी शेतात काम चालू असल्या कारणाने खुरपणी करण्यासाठी मजूर मिळत नाही, यामुळे या भागातील शेतकरी सायकल या आधुनिक यंत्राचा वापर करीत आहेत. सायकल या यंत्राचा वापर केल्यामुळे वेळही कमी लागतो व कामही अधिक केले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे.