शिक्रापूर – येथील पुणे-नगर महामार्गावर मलठण फाटा परिसरात जीवघेणा ठरत असलेले गतरोधक अखेर हटविण्यात आले आहेत. याबाबत दैनिक प्रभातने वेळोवेळी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. याप्रयत्नांना अखेर यश आले आहे.
पुणे नगर महामार्गावरील मलठण फाटा परिसरात असलेल्या साई सहारा पेट्रोलपंपच्यासमोर काही दिवसांपूर्वी येथील व्यावसायिकांनी रस्त्यावरील दुभाजक तोडून रस्ता तयार केला होता. येथे झालेल्या अपघातांमुळे अनेक वाहनांचे नुकसान व काही नागरिकांना मोठ्या इजा झालेल्या आहेत, तर काही वाहनेदेखील या दुभाजकामुळे उलटली असल्याचे प्रकार घडले आहेत.
दैनिक प्रभातच्या पाठपुराव्याला यश
त्यामुळे येथील गतिरोधक हटविण्यात यावेत, अशी मागणी येथील उद्योजक गणेश सातकर यांनी केली होती. दैनिक प्रभातने याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांनी गतिरोधक काढून टाकले आहे.