वक्तृत्वकला प्रयत्नांनी प्राप्त होणारे कौशल्य

भाषणकलेच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्याआधी परतीचे सर्व दोर कापून टाकले पाहिजेत. धाडस हे ध्येवसिद्धीचे महत्वाचे लक्षण आहे. वक्तृत्वकला ही देणगी नसून प्रयत्नांनी प्राप्त होणारे कौशल्य आहे. ज्याप्रमाणे सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले होते आणि मावळ्यानी ‘जिंकू किंवा मरु’ ही वृत्ती अंगी बाणली त्याप्रमाणे समोर बसलेल्या श्रोत्यांबदल वाटणारी भीती तुम्ही घालवू शकता. फक्त त्यासाठी धाडसी वृत्ती व जिद्द असायला हवी.

आपण नेमके या ठिकाणीच अगदी उलट करतो एखादी समस्या निर्माण झाली की, प्रथम घावरतो. मनाने आपण तेथेच खचतो. लहानपणी आपण शाळेतकधीतरी व्याख्यानासाठी, भाषणासाठी उमे राहतो. आपल्या हातून चूक होते. त्यावर सर्व विद्यार्थी हसतात. आपले झालेले हसू पाहून खजील होऊन आपण गडबडीने पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो. प्र. के अत्रे यांच्या पहिल्याच भाषणात असेच घडले होते.

अशा प्रसंगाने या बाल बयामध्ये मनाच्या पटलावर ते अपमानित क्षण कायमचे उमटतात. मोठे झालो तरी ते ओझे सतत होक्‍यात घेऊन छोटीशी चूक अधिक बिकट व मोठी करतो; परंतु प्र. के. अत्रे हे जिहीने त्यावर मात करून प्रसिद्ध वक्‍ते म्हणून प्रसिद्ध झाले.

हातात धरलेला ग्लास वेळीच खाली ठेवला नाही, तर हाताला होणारी दुखापातीस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे बेळीच हे सर्व विसरून ते ओझे पेकून बर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आनंदाने पालवायला हवा. वक्‍तृत्व साधनेसाठी वयाची अट नसते. लहानपणी चांगले बोलायला लागल्यापासून पुढे जीवनभर ही कला आपण हस्तगत करू शकतो.

आपल्या भाषणाच्या सतत कोणत्या ना कोणत्या कृतीविषयी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहावे. माझे विचार सकारात्मक करून मी वक्ता बनेनच! अश दृढता हवी.
एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकतच राहावेत, त्याच्या रसाळ वाणीचा आनंद असाच घेत राहावा असे जेव्हा श्रोत्यास वाटते, तेव्हा खऱ्या अर्थाने ती वक्‍त्याच्या यशस्वीतेची पावती असते. वाणीच्या सामर्थ्यावर अनेकांनी सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने लाखमोलाचे कार्य केले आहे. म्हणतात ना…

शतेषु जायते शूरः सहस्रेषुच पंडितः।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।।

या संस्कृत वचनात वक्‍त्याची श्रेष्ठता सांगितली आहे की, शेकड्यातएखादाच शूरवीर जन्म घेतो. हजारात एक पंडित असतो. मात्र, वक्ता फक्त दहा हजारांतच एखादाच निर्माण होऊ शकतो.

प्रा.सुरेखा कटारिया
डॉ. श्‍वेता राठोड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)