केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी लोकांना विशेषत: पाश्चात्य देशातील नागरिकांना अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारे उत्पादन म्हणजे “विको’. दंतमंजनापासून ते सौंदर्य प्रसाधनापर्यंत एका चढीत एक दर्जेदार उत्पादने देणारी कंपनी ही मराठी व्यावसायिक कुटुंबाची आहे. विको लॅब्रोटरीजचे संचालक संजीव गजानन पेंढारकर यांनी विकोची उत्पादने जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये पोहचविली. नुकताच विको उत्पादनाला दाजीकाका गाडगीळ उद्योगरत्न पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांच्याशी केलेली खास बातचीत…
तोंडात बोट घालणे हे पाश्चात्य जीवनशैलीला मान्य नसते, परंतु बोटावर मंजन लावून दात घासण्यास भाग पाडणारे “विको’ भारतीय आयुर्वेदाचाही प्रचार-प्रसार करत आहे. विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांनी दैनिक “प्रभात’शी वेगवेगळ्या विषयांवर, त्यांच्या उत्पादनांवर तसेच सध्याच्या देशाच्या आणि जागतिक औद्योगिक व व्यावसायिक परिस्थितीत बाबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.