IPL – मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या कायरान पोलार्डने दोन-तीन दिवसांपूर्वी आयपीएलला राम राम केला. त्यानंतर लगेच त्याला आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मुंबई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. पोलार्डने 13 वर्षे आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळले आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेन्द्र चहलने पोलार्डला त्याच्या आयपीएल निवृत्तीबाबत एक खास संदेश लिहिला आहे.
IPL 2023 | ग्लेन मॅक्सवेलबाबत महत्वाची अपडेट, पुढील IPL हंगामासाठी…
पोलार्डच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याला विविध स्थरांतून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये सहकारी खेळाडूंसह माजी खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, युझवेंद्र चहलने पोलार्डसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पोलार्डसोबतचे फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.
चहलने लिहिले की, “पॉली तुला तुझ्या अप्रतिम कारकीर्दीबद्दल अभिनंदन. तू एक महान फलंदाज होतास आणि तुला गोलंदाजी करणे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे नव्हते. मैदानावर तु तुझ्या खेळण्याच्या निर्भय वृत्तीने अनेकांना प्रेरणा दिली आहेस. वेगळ्या जाबदारीत जाताना तुला खूप यश लाभो आणि त्यासाठी शुभेच्छा. मैदानावर तुमच्यासोबतच्या हसण्या-बोलण्याला नेहमीच उणीव भासेल.”
जेव्हा मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ( IPL 2023 ) पुढील हंगामासाठी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, तेव्हा कायरान पोलार्डचे नावही त्यामध्ये होते. मात्र, पोलार्डने याआधीच निवृत्ती जाहीर केली होती आणि मुंबई इंडियन्सनंतर कोणत्याही संघाकडून खेळणार नसल्याचे सांगितले होते. १३ वर्षे मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळल्यानंतर तो आतासंघासोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे.