अमित शहा यांना पंतप्रधानांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो अशा शब्दात मोदींनी शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहा यांचा जन्म 22 ऑक्‍टोबर 1964 साली झाला. आज ते 55 वर्षाचे झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कर्मठ, अनुभवी, कुशल संगठनकर्ता आणि मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अमित शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचे योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायू आणि प्रकृती नेहमी उत्तम ठेवो, असे ट्‌विट मोदींनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्याकडून अशाच प्रकारे देशाची सेवा होत राहो, असं गडकरींनी म्हटलं आहे.


केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही शहा यांना शुभेच्छा देताना दिर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी शहा यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.