fbpx

चर्चा तर होणारच! दिशा पटानीने दिल्या दसऱ्याच्या ‘खास’ शुभेच्छा

मुंबई – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल (दि. २५) संपूर्ण देशात दसरा साध्या पद्धतीने साजरा झाला. यंदा जरी प्रत्यक्ष घरी जाऊन शुभेच्छा देता आल्या नाही, तरी सोशल मीडियावर सर्वांनींच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यात सिनेकलाकार देखील मागे नव्हते. प्रत्येकानेच आपल्या फॅन्सला सोशल मीडियावर शुभेच्छा दिला.

बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पटानी’ हिने सुद्धा सर्वांना ट्विटरवरुन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिशाने शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

शुभेच्छा देताना दिशाने एक चिन्ह वापरले होते ते आपट्याच्या पानांचे किंवा अन्य कशाचे नव्हते तर ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे होते. महत्वाचे म्हणजे या फोटोवरील रंग हा भगवा होता. यामुळे सोशल मीडियावर या ट्विटचीच जोरदार चर्चा रंगली.

दिशा पटानी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘मैत्री’च्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. तसंच अनकेदा एकमेकांना भेटले असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

काल शिवसेनेचा दसरा मेळावा मर्यादित नेतेमंडळी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.