पुणे (प्रभात वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक 7 वाकडेवाडी- पुणे विद्यापीठ भागातील नागरिकांसाठी करोना प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन नगरसेविका सोनाली लांडगे यांच्या वतीने करण्यात आले होते. या मोहीमेत सुमारे 210 जणांचे लसीकरण करण्यात आले. मुळारोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन येथे ही लसीकरण मोहीम पार पडली.
विमल यादव,दीपा भैरट, लक्ष्मी सपकाळ,सुप्रिया भिसे सुरेखा माने,रेखा झिटे ,संतोष लांडगे,राकेश सपकाळ,राजेश यादव,निकोलस स्टेनिसलोस,निखिल लांडगे,आकाश जाधव,संकेत मोरे,आरिफ शेख ,सौरभ लांडगे, प्रतीक जाधव,व स्थानिक नागरिक उपस्थित होते