पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेच्या वतीने आणखी तीन मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्याहून जम्मू तावीसाठी गाडी सुटणार आहे.
मार्चपासून रेल्वेच्या प्रवासी सेवेला स्थगिती दिली होती. या कालावधीत श्रमिक विशेष, मालगाड्या, पार्सल गाड्या सोडण्यात येत होत्या. 1 जूनपासून 200 प्रवासी विशेष गाड्या धावण्यास सुरुवात झाली. या गाड्या लॉकडाऊन पूर्वीच्या गाड्यांप्रमाणेच धावत असून, या संख्येत सध्या वाढ होत आहे.
पुण्यातून 1 डिसेंबरपासून दररोज जम्मू तावीसाठी विशेष गाडी सुटणार आहे. तर 3 डिसेंबरपासून दररोज जम्मू तावी येथून दररोज विशेष गाडी सुटणार आहे. ही गाडी शहाबाद मार्कंडा, हजरत निजामुद्दीन आणि तिमार्णी वगळता ही स्थानके वगळता झेलम एक्स्प्रेसप्रमाणे धावणार आहे.
याशिवाय 1 डिसेंबरपासून मुंबई-फिरोजपूर सूपर फास्ट विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-कोइंबतूर विशेष गाडी धावणार आहे.