पुणे – प्रवासी वाढती गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्याहून चार गाड्या धावणार आहेत.
प्रवासी गाड्या बंद असल्याने सध्या रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देखील सुमारे 100 गाड्या धावत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
23 जानेवारीपासून दर शनिवारी पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट विशेष आणि 24 जानेवारीपासून दर रविवारी अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट विशेष गाडी धावणार आहे. 24 जानेवारीपासून दर रविवारी पुणे-भगत की कोठी (राज्य. राजस्थान) विशेष आणि 26 जानेवारीपासून दर मंगळवारी भगत की कोठी ते पुणे विशेष गाडी धावणार आहे.
27 जानेवारीपासून दर बुधवारी पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट विशेष आणि 28 जानेवारीपासून दर गुरुवारी अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट विशेष गाडी धावणार आहे. तर, 25 जानेवारीपासून दर सोमवारी पुणे-भुज विशेष आणि 27 जानेवारीपासून दर बुधवारी भुज-पुणे विशेष गाडी धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.