पुणे – मध्य रेल्वेतून धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे स्थानकामार्गे धावणाऱ्या गाड्यांना समावेश आहे.
करोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प आहे. या कालावधीत श्रमिक विशेष, पार्सल गाड्या सोडण्यात आल्या. तर, जूनपासून विशेष गाड्या धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांना जानेवारी अखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
बेंगळुरू-जोधपूर (27 जानेवारी), मैसुरु-अजमेर, यशवंतपूर-जयपूर (28 जानेवारी), बेंगळुरु-अजमेर (29 जानेवारी), बेंगळुरू-गांधीधाम, जोधपूर-बेंगळुरू, जयपूर-यशवंतपूर, हुबळी-एलटीटी (30 जानेवारी), अजमेर-म्हैसूर, बेंगळुरू-जोधपूर, एलटीटी-हुबळी (31 जानेवारी), अजमेर-बेंगळुरू(1 फेब्रुवारी), गांधीधाम -बेंगळुरू (2 फेब्रुवारी), जोधपूर-बेंगळुरू (3 फेब्रुवारी) या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ दिली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.