पुणे -प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून विशेष साप्ताहिक रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे. त्यापैकी पुण्याहून संतरागाछी आणि हटीया या मार्गांवर रेल्वे सुटणार आहे. तर, कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन या मार्गावरील रेल्वे पुणेमार्गे धावणार आहे.
10 ते 24 जूनदरम्यान संतरागाछी ते पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस दर गुरुवारी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे. 12 ते 26 जूनदरम्यान, पुणे ते संतरागाछी सुपरफास्ट एक्स्प्रेस दर शनिवारी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी संतरागाछी येथे पोहोचणार आहे. तर, 11 ते 25 जूनदरम्यान दर शुक्रवारी पुणे-हटीया एक्स्प्रेस धावणार असून, तिसऱ्या दिवशी ती हटीया येथे पोहोचणार आहे. तर, 9 ते 23 जूनदरम्यान दर बुधवारी हटीया येथून एक्स्प्रेस सुटणार असून, तिसऱ्या दिवशी पुणे येथे पोहोचणार आहे.
याशिवाय, 6 जुलैपासून दर मंगळवारी कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार असून, ती कोल्हापूरहून सकाळी 9.10 वाजता सुटणार आहे. तर, पुण्यात सायंकाळी 4.10 वाजता पोहोचणार आहे. हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 8 जुलैपासून धावणार असून निजामुद्दीन येथून सकाळी 5.10 वाजतासुटणार आहे. तर, पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता पोहोचणार आहे.