पुणे- पुणे-जसीडीह (झारखंड) मार्गावर साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. 27 सप्टेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते जसीडीह-पुणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द केल्या होत्या. अनलॉकच्या अनुषंगाने काही रेल्वे मार्ग सुरू केले असून, नवीन मार्गांवरदेखील सेवा सुरू करण्यात येत आहे.
1 ऑक्टोबरपासून पुण्यातून झारखंडसाठी रेल्वे धावणार आहे. 1 ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी पुण्याहून सकाळी 6.35 सुटणार असून, जसीडीह येथे दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचेल, तर 3 ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री 8.25 सुटणार असून, तिसऱ्या पुणे स्थानकात दाखल होणार आहे. ही रेल्वे दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, गया या मार्गे धावणार आहे.