पुणे – पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 12 जानेवारीपासून पुणे-भुवनेश्वर-पुणे मार्गावर विशेष साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी भुवनेश्वर येथून दर मंगळवारी रवाना होणार असून, तिसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात पोहोचणार आहे. तर, 14 जानेवारीपासून पुणे-भुवनेश्वर गाडी दर गुरुवारी सुटणार असून, ही गाडी दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर येथे पोहोचणार आहे.
ही गाडी सोलापूर, कलबुर्गी, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी ठिकाणी थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.