बॉलीवूड अभिनेत्री काजोलने युवा कलाकारांना खास टीप्स देत सांगितले की, आपण आपला मूळ अभिनयावर कायम राहिले पाहिजे. काजोलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर आपल्या चाहते आणि फॉलोअर्ससोबत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. ज्यात तिच्या चाहत्यांपैकी एकाने तिला युवा कलाकारांसाठी टीप्स विचारल्या होत्या.
याबाबत अभिनेत्री काजोल म्हणाली, आपण ओरिजिनल राहिले पाहिजे, कोणाचीही कॉपी करू नये. आपल्याला जे येते ते काम प्रामाणिकपणे करावे. कितीही संघर्ष करावा लागला तरी तो करावा, असा सल्ला तिने दिला.
अन्य एका जणाने विचारले की तुम्ही द्वेषाला कसे सामोरे जाता? यावर काजोल म्हणाली, द्वेषबुद्धीचा सामना केला जाऊ शकत नाही. यासाठी आपण नेहमी आनंदी राहावे आणि अधिक सकारात्मक व्हावे. या संवाद सत्रात काजोलने अशा अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास काजोला लवकरच डिजिटल माध्यमात डेब्यू करणार आहे. ती रेणुका शहाणेद्वारा दिग्दर्शित “त्रिभंगा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.