#HBD : ‘सचिन तेंडुलकर’ आणि ’24’ तारीख, नेमकं काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…

-स्वप्निल हजारे

पुणे – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 24 तारीख याचं एक खास कनेक्शन आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973ला झाला. हा तो दिवस आहे, त्यादिवशी सचिनने आपल्या जीवनाची सुरूवात केली, त्याचबरोबर 24 तारखेदिवशी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जाणून घेऊया सचिनसाठी 24 तारीख का महत्वाची आहे….

24 एप्रिल 2019 – तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 46 वा वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला.

सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी आणि 463 वन डे सामने खेळले आहेत.कसोटी मध्ये 49 शतके तर वन -डे मध्ये 51 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून एकूण 34,357 धावा त्याच्या नावे आहेत.

31 वर्षापूर्वी 24 फेब्रुवारी दिवशी 664* धावांची विक्रमी भागीदारी केली होती…

24 फेब्रुवारी 1988 –  31 वर्षापूर्वी लहानसा सचिन माध्यमाच्या प्रकाशझोतात आला होता, ज्यामुळे त्याला क्रिकेट विश्वात ओळख मिळाली होती. सचिनने आपला बालमित्र विनोद कांबळी यांच्यासोबत हॅरिस शील्ड स्पर्धेच्या उपांत्यफेरीत नाबाद 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. यामध्ये सचिनने नाबाद 326 आणि कांबळीने नाबाद 349 धावा केल्या होत्या. त्यावेळेस काबंळी 16 तर सचिन 14 वर्षांचा होता. ही भागीदारी त्यावेळेस कोणत्याही श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी ठरली होती. सचिन-कांबळी यांनी आॅस्ट्रेलियन जोडी टी. पैटाॅन आणि एन. रिपाॅन यांचा विक्रम मोडीत काढला होता. बुफैले संघासाठी या जोडीने 1913-14 मध्ये 641 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान 19 वर्षानंतर हैदराबादमध्ये मनोज कुमार आणि मो. शैबाज यांनी 721 (तिसऱ्या विकेटसाठी) धावांची भागिदारी करत हा विक्रम मोडीत काढला होता.

9 वर्षापूर्वी 24 फेब्रुवारी 2010 ला सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक व्दिशतक पूर्ण केले होते.

24 फेब्रुवारी 2010 – या दिवशी 39 वर्षीय सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनला. ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात सचिनने 147 चेंडूत नाबाद 200 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षानंतर वीरेंद्र सेहवागने 219 धावा करत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनसह इतर 8 खेळाडूंनी व्दिशतक झळकावले आहेत. रोहित शर्मा याने एकट्याने तीन व्दिशतके केली आहेत.

आणखी काही 24 तारखेसंबंधी सचिनची कनेक्शन –

24 नोव्हेंबर 1989 – यादिवशी सचिनने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिल अर्धशतक केलं होतं. पाकिस्तान विरूध्द फैसलाबादमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकं करण्याचा कारनामा त्यानं केला होता.

 

24 मे 1995 – सचिनचा विवाह झाला.

24 सप्टेंबर 1999 – सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा जन्मदिवस.

तसेच 1989 ते 2013 अशी एकूण 24 वर्षाची त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारर्कीद राहिली.

मास्टर ब्लास्टरचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला. त्याचे लग्न 24 मे 1995 ला झालं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 24 सप्टेंबर 1999 ला झाला. याशिवाय त्यानं 24 तारखेला अनेक विक्रम केले आहेत. त्यामुळंच 24 ही सचिनची लकी तारिख ठरली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.