पुणे – प्रयागधाम येथील मकरसंक्रांती उत्सवानिमित्त रेल्वेच्या प्रवासी गाड्यांना उरुळी स्थानकांत विशेष थांबा देणार आहेत. पुणे विभागामार्गे धावणाऱ्या काही गाड्या उरुळी स्थानकात एक मिनिटांसाठी थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त उरूळी येथे प्रवासी गाड्यांना थांबा देण्यात येतो. त्याचप्रमाणे यंदा देखील 3 विशेष गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. 24 जानेवारीपर्यंत वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला थांबा दिला असून, ही गाडी उरूळी येथून सकाळी 4.51 वाजता रवाना होणार आहे. तर, हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस 24 जानेवारीपर्यंत थांबा दिला असून, ही गाडी उरूळी येथून दुपारी 4.06 वाजता रवाना होणार आहे.
यासह यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन या गाडीला 15, 20 आणि 22 जानेवारी रोजी थांबा देण्यात येणार असून, ही गाडी सकाळी 9.25 वाजता उरुळी येथून सुटणार आहे. तर, हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेसला 14, 16, 21 आणि 23 जानेवारी रोजी थांबा देण्यात येणार असून, ही गाडी सकाळी 10.05 वाजता उरूळी येथून रवाना होणार आहे. तर, यशवंत- हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (06523) या गाडीला देखील 17 जानेवारी रोजी थांबा दिला असून, ही गाडी सकाळी 8.55 वाजता उरूळी येथून रवाना होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.