जाणून घेऊयात मिफ 2020 ची ठळक वैशिष्ट्ये

मिफ 2020 मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात युरोपीय महासंघातील चित्रपटांसाठी विशेष पॅकेज, फिनलँड, बाल्कन आणि रशियातील अॅनिमेशनपटांचे पॅकेज, ‘फॉव्ह’, ‘डिटेन्मेंट’, ‘नाईट ॲट द गार्डन’ असे ऑस्कर पुरस्कार नामांकित चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत. ‘कंट्री फोकस’ विभागात आयर्लंडचे सर्वोत्कृष्ट माहितीपट दाखवले जाणार आहेत.

त्याशिवाय, ईशान्य भारतातील निवडक माहितीपट-लघुपट, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेले चित्रपट, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे चित्रपट, ‘सुकुमार रे’, ‘रबिन्द्रनाथ टागोर’, ‘द इनर आय’ आणि सुप्रसिद्ध चित्रपट ‘पिकू’ देखील दाखवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट विभागात, एफटीआयआय/ एसआरएफटीआय/ एनआयडी/एफटीआयटी/ सृष्टी/क्राफ्ट स्कूल/विसालिंग वूड अशा विविध चित्रपटनिर्मिती प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट दाखवले जातील. इतर वैशिष्ट्यांमध्ये, आयडीपीए द्वारे आयोजित मुक्त व्यासपीठ, “चित्रपट संकलन(फिल्म एडिटिंग) विषयावर बी लेनिन यांची कार्यशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ड्रोन्स द्वारे “ड्रोन सिनेमॅटोग्राफी’ या विषयावरील कार्यशाळा, पोलंडचे सुप्रसिद्ध अॅनिमेटर मायकेल डूडो दे विट, कॅनडाचे चित्रपट समीक्षक थॉमस व्हॉ आणि इतर मान्यवरांचे मास्टर क्लासेस होणार आहेत.

त्याशिवाय, महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त तसेच सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून एक विशेष मूर्ती आणि चित्रप्रदर्शन देखील या महोत्सवात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासोबतच, मृणाल सेन, राम मोहन, भीमसेन खुराना, व्ही जी सामंत, विजया मुळ्ये, मंजिरा दत्ता या दिग्गज कलाकारांना आदरांजली म्हणून त्यांच्या निवडक कलाकृती या महोत्सवात दाखवल्या जाणार आहेत. आणखी एक विशेष म्हणजे या महोत्सवात काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपट विशेष विभागात दाखवले जाणार आहेत.

मिफ्फमध्ये माहितीपट, लघुपट आणि अनिमेशनपाटांच्या क्षेत्रातील दर्जेदार कलाकृतींचा सुवर्ण आणि रौप्य शंख देऊन गौरव तर केला जातोच; त्याशिवाय, विविध स्पर्धा विभागातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसेही दिली जातात. 16 व्या मिफ्फ मधील सर्वोकृष्ट चित्रपटाच्या मानाच्या पुरस्काराचे स्वरुप सुवर्णशंख आणि 10 लाख रुपये इतका आहे. तर इतर पुरस्कारांमध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. पदार्पणातील दिग्दर्शनासाठीचा ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार’ देखील समारोपाच्या दिवशी दिला जाईल. यावर्षीपासून या महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा पुरस्कार, “जल संवर्धन आणि हवामानबदल” या विषयावरील लघुपटासाठी एक नवा पुरस्कार दिला जाणार असून एक लाख रुपये रोख आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहितीही स्मिता वत्स शर्मा यांनी दिली.

प्रतिष्ठीत डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारचे स्वरुप 10 लाख रुपये रोख,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून माहितीपट आणि लघुपट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा या पुरस्काराने समारोप प्रसंगी गौरव केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

चित्रपटाच्या उत्तम मार्केटींगसाठी चित्रपट निर्माते आणि ओटीटी प्लेअर्स यांच्यात बैठका आणि सुसंवाद घडवून आणण्यासाठी मिफ 2020 उत्तम मंच ठरेल असे मतही महोत्सव संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेदरम्यान मिफ्फ संचालकांच्या हस्ते डेलिगेटसाठीच्या मिफ्फ ॲपचेही उद्‌घाटन करण्यात आले. या ॲपद्वारे डेलिगेट्स चित्रपटांसाठी आपले मतही नोंदवू शकणार आहेत. मिफ्फ ॲपची लिंक पुढीलप्रमाणे:- http://onelink.to/miffindia

सर्व नोंदणीकृत डेलिगेट्‌सना परस्परांशी संवाद साधण्यासाठी ॲपमध्ये स्वत:ची व्यवस्था आहे. खालील QR कोडद्वारेही हे ॲप डाऊनलोड करता येईल.

मिफ 2020 चाच भाग असलेल्या आणखी तीन ठिकाणी या महोत्सवादरम्यान चित्रपट दाखवले जात आहेत. त्यात एक, मुंबईत कालिना येथे असलेल्या विद्यापीठ परिसर, मालाडचे देबिप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज आणि पार्ल्याच्या उषा प्रवीण गांधी कॉलेज मधेही काही चित्रपट दाखवले जाणार आहेत. माहितीपट आणि लघुपट क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.

डेलिगेट नोंदणी आणि इतर सविस्तर माहितीसाठी www.miff.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा miffindia@gmail.com या मेलआयडीवर संपर्क साधावा..

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here