Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru) ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिध्द्धी मिळाली. या चित्रपटात ‘आर्ची’ नावाची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. या चित्रपटाच्या यशानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. नुकतेच ती ‘ झिम्मा 2’ या चित्रपटात पाहायला मिळाली. यातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रिंकूने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
रिंकूने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “माझं लग्न झालेल नाही पण, सासू पाहिजेल तर अशी,” असं रिंकूने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या तिच्या या पोस्टवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा 2’ या सिनेमात रिंकू आणि निर्मिती सावंत एकत्र झळकल्या आहेत.
View this post on Instagram
या सिनेमात रिंकू निर्मिती सावंत यांच्या सूनेच्या भूमिकेत आहे. ‘झिम्मा 2’ मध्ये रिंकूने तानिया तर निर्मिती सावंत यांनी निर्मला हे पात्र साकारले होते. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’मध्ये रिंकू आणि निर्मिती यांच्याबरोबर सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा अॅनिमल आणि साम बहादूर या बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर देताना दिसत आहे. जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा मजेदारपणे झळकत आहे.