पुणे – “अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’ (ईसीए) या संस्थेने बालवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन मोबाइल ऍप कार्यान्वित केले आहे. या ऍपद्वारे आठ प्रादेशिक भाषांमधून प्रशिक्षण मिळणार आहे. ईसीएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “एज्युफेस्ट’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या राष्ट्रीय कोर समितीचे सदस्य आदित्य तापडिया यांच्या हस्ते झाले.
पुणे क्षेत्राचे प्रमुख मसरत तवावाला, इन्सिया रहीम, हर्षिता शर्मा यांच्या पुढाकाराने पुण्यातील हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंकिता संघवी, स्मिता अग्रवाल, शिल्पा सोळंकी आदी उपस्थित होते.
यशदा व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर या दोन ठिकाणी 96 सत्रांमध्ये 70 हून अधिक वक्त्यांनी तीन दिवसांत मार्गदर्शन केले.
बालवाडीच्या शिक्षिका व सेविकांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित या कार्यक्रमात पुण्यातून सुमारे 80 बालवाड्यांतून एक हजार शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. यात 350 शिक्षिका या वैयक्तिकरित्या सहभागी झाल्या होत्या. यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 80 पेक्षा अधिक प्रशिक्षक होते. त्यापैकी 28 प्रशिक्षक हे पुण्या बाहेरचे होते. यात उच्चार, सामाजिक विकास, त्यांचा सहभाग, व्यक्तिमत्व विकास या सगळ्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले.