-->

ये जीवन है अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ

टीम इंडियाला बीग बी यांच्याकडून खास संदेश

मुंबई – बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत भारतीय संघाला संदेश दिला असून त्याद्वारे संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ… अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. अशा शब्दात बीग बी यांनी भारतीय संघाला नव्या उमेदीने बॉक्‍सिंग डे कसोटीत उतरण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर बीग बी यांच्या या पोस्टवर करोडो लाईक्‍स मिळत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 36 धावांवर बाद झाला. या पराभवानंतर भारतीय संघाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. पण अमिताभ बच्चन यांनी मात्र भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यासाठी खास संदेश दिला आहे.

भारताच्या पराभवानंतर सर्वसामान्य चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण बीग बी यांनी मात्र, संघाची पाठराखण केली आहे. 

बच्चन यांनी ट्विटवर एक संदेश लिहला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना… काळजी करण्याची गरज नाही, हा फक्त एक वाइट दिवस होता. आपण पुन्हा चांगली कामगिरी करू. आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाइट दिवस येतात. पण सेट बॅकचे उत्तर कमबॅकने देऊ! त्याच बरोबर अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध अग्निपथ या चित्रपटात बच्चन यांचे पीता हरिवंशराय बच्चन यांच्याच अग्निपथ या कवितेतील ओळी पोस्ट केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.