नवी दिल्ली – चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा सण यंदा आज साजरा होत आहे. करोनाच्या संकटाचे नैराश्येचे मळभ असले, तरी नागरिक हिंदू नववर्षाच्या स्वागत करत आहेत. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मराठीतून खास शुभेच्छा दिल्या आहेत.
रामनाथ कोविंद यांनी म्हंटले कि, गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा, अशा शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.
— President of India (@rashtrapatibhvn) April 13, 2021
तसेच, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्टहले आहे.
Greetings on Gudi Padwa. pic.twitter.com/4V8ya3EfZd
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021