माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या मुलींसाठी काहीही करण्यास तयार असते. मग ती चांगल्यात चांगली लाइफस्टाईल असो की त्यांच्या बर्थडे विश पूर्ण करण्याची असो. अभिनेत्रीने असेच काहीसे करत आपली छोटी मुलगी अलिसाहला बर्थडेपर खास गिफ्ट दिले आहे. ते गिफ्ट पाहिल्यास सर्वाच्या तोंडून “वाह’ असा शब्द आपोआपच निघेल.
सुष्मिताने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओत ती अलिसाहसोबत स्कूबा डाइविंगची तयारी करताना आणि त्यानंतर डाइवचा आनंद घेता दिसते. हा व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने कॅप्शन लिहिली की, अलिसाह स्कूबा डाइविंगचा आनंद खूप पूर्वी घेवू इच्छित होती. पण असे करण्यासाठी कमीत कमी 10 वर्षे वय आवश्यक होते.
यामुळे तिला तब्बल 5 वर्षे प्रतिक्षा करावी लागली. आता ती 10 वर्षांची झाली असून आपली पहिली स्कूबा डाइविंगचा आनंद घेण्यासाठी ती तयार झाली आहे. या कॅप्शनवरूनच सुष्मिता आपल्या मुलींची विश पूर्ण करण्यासाठी आणि हा दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी दोन्ही मुलींसह बॉयफ्रेंडसोबत मालदीवला गेली होती.
सुष्मिताने सांगितले की, तिची मोठी मुलगी आणि तिने येथेच पहिल्यांदा डाइविंगचा अनुभव घेतला आणि आता अलिसाहनेही डाइविंगचा आनंद घेतला आहे.