बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी “आरआरआर’ चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटातून आलिया साउथ सिनेसृष्टीत पर्दापण करत आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातील फर्स्ट लुकमध्ये आलिया भट्ट ही हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाउज या पारंपारिक वेशात मंदिरामध्ये बसलेली दिसत आहे. या ऍथनिक लुकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. हा लुक रिलीज करत चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे की, आता प्रतिक्षा संपली आहे.
View this post on Instagram
सीताच्या भूमिकेतील आलियाचा हा फर्स्ट लुक. हॅप्पी बर्थ-डे आलिया. या चित्रपटात आलिया भट्टसह साउथ सुपरस्टार राम चरण तेजा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट फक्त कॅमियो रोल साकारत असून तो खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे समजते.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलिया भट्ट सध्या आगामी “गंगू बाई काठियावाडी’ चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भंसाली करत आहे. याशिवाय आलिया लवकरच “ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे.
View this post on Instagram