कोविड साथीच्या रोगाने आपल्यापुढे जी अनेक आव्हाने निर्माण केली त्यापैकी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे शैक्षणिक आणि करिअरसंबंधी निवडीचे आहे. या कठीण काळाने आपल्या करिअरमध्ये आपत्कालीन पर्यायांसह विविधतेचा पैलू राखण्याचे महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित केले आहे. वर्ष 2030 मध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधींपैकी 85 टक्के संधी सध्या अस्तित्वातच नाहीत. अनेक पारंपरिक विशेषतांची (स्पेशलायझेशन्स) जागा ही मोलीक्युलर गॅस्ट्रोनॉमी, वर्तणूक वित्त, हवामानशास्त्र, संज्ञानात्मक मानसशास्त्र, अनुवंशशास्त्र कायदा इत्यादीसारख्या नवीन-युगातील पेशांकडून घेतली जाईल, ज्यासाठी आंतरशास्त्रीय शिक्षणाची आवश्यकता भासणार आहे.
नेहमीच करिअरच्या नवीन प्रवाहांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मुंबई शहर हे इतर शहरांपूर्वी या होऊ घातलेल्या नवीन बदलांना पुन्हा एकदा प्रतिबिंबित करेल अशी अपेक्षा आहे. वेगाने बदलणार्यां रोजगाराच्या परिस्थितीत, शैक्षणिकदृष्ट्या वरचढ तसेच फिरतीवर असणाऱ्या आणि मोठा प्रवास करणाऱ्या तरुणांचा मोठा भरणा असणाऱ्या मुंबईचे स्थान नेहमीच वरचे राहणार आहे. अठरा वर्षांखालील चार कोटींहून अधिक युवांचा भरणा असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रालाच काळाच्या पुढे राहण्याचा विशेष लाभ मिळणार आहे.
सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मदत करण्यासाठी इन्स्टिट्यूट फॉर करिअर स्टडीजने (आयसीएस) आपल्या मोबाइल ऍप, तसेच आयसीएस करिअर जीपीएसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या करिअर मार्गदर्शनाच्या सेवा खुल्या केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर असंख्य विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. विशेषत: नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या महाराष्ट्रातील टियर-2 शहरांमधील तरुणांपर्यंत पोहचायचे आहे, असे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) राबविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सुकाणू समितीच्या सदस्या आणि आयसीएसच्या संस्थापक-संचालिक आणि डॉ. अमृता दास म्हणाल्या.
डॉ. दास म्हणाल्या, आपल्या देशात करिअर मार्गदर्शनाची आवश्यकता असलेले पाच कोटी विद्यार्थी आहेत. करिअर जागरूकता सर्वेक्षणातून आढळून आले आहे की, प्रत्यक्षात 250 हून करिअर संधी उपलब्ध असताना, केवळ सात करिअर पर्यायांचीच माहिती 85 टक्के भारतीय विद्यार्थ्यांना आहे. आयसीएस करिअर जीपीसी हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वारस्यानुरूप करिअरचे मार्गदर्शन करते. ऍसपमधील सखोल चाचण्या त्यांना त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरतील अशा करिअरची संक्षिप्त सूची मिळविण्यास सक्षम करतात. वापरकर्त्यास करिअरचा अहवाल आणि त्या संदर्भात उपलब्ध अभ्यासक्रम, शिक्षण संस्था- कॅम्पस आणि करिअरच्या मार्गांबद्दल माहिती तसेच आमच्या सल्लागारांसह थेट संवादाची संधी हे सर्व विनामूल्य मिळते. युवकांना त्यांच्या स्वप्नातील करियर शोधण्यात मदत करणे असा यामागे उद्देश आहे.
ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने आयसीएस करिअर जीपीएस आपल्या करिअर पोर्टलवर त्या भागातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी उपलब्ध केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी2020) च्या अंमलबजावणीसह निर्माण होतील अशा नवीन विषय आणि करिअरच्या संधींना या मोबाईल उपयोजनांत ठळळपणे दर्शविले गेले आणि वैयक्तिकृत समुपदेशनासाठी तज्ज्ञांशी संवादाची सुलभ संधी देखील प्रदान केली गेली. या व्यतिरिक्त, सीएसआर उपक्रम म्हणून आयसीएसने 1 ऑगस्टपासून 1,000 हून अधिक विनामूल्य वैयक्तिकृत समुपदेशनाचे कार्यक्रम पार पाडले आहेत.