पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीच्या विशेष बसेस

स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन येथून सुटणार बसेस

पुणे – श्रीक्षेत्र देहू येथून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. 24 जूनपासून, तर आळंदी येथून संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 25 जूनपासून सुरू होणार आहे. यानिमित्त भाविकांसाठी पीएमपीकडून पालखीमार्गावर विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.

दि. 22 जून ते दि. 26 जून : आळंदीसाठी स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड आणि पिंपरी रोड या ठिकाणांहून 112 बसेस धावणार आहेत.

दि. 25 जून : रात्री 12 वाजेपर्यंत आळंदीसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहेत. याशिवाय देहूसाठी पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी या ठिकाणाहून सध्या संचालनात असणाऱ्या आणि जादा बसेस अशा एकूण 29 बसेस सोडण्यात येणार आहेत. तर देहू ते आळंदी मार्गावर 9 बसेस धावणार आहेत.

दि. 26 : पहाटे 3 वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणांहून 28 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर, सकाळी 5.30 पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून 95 बसेस भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत सोडण्यात येणार आहेत.

दि. 28 : महात्मा गांधी स्थानक (पुलगेट) येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदीसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. तर कात्रज, कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर, वाघोलीकडे जाण्यासाठी मगरपट्टा येथून बसेस सोडण्यात येणार आहेत.

बोपदेव घाटमार्गेही बसेस
पालखी मार्ग असल्याने हडपसर ते सासवडदरम्यान दिवेघाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या बसेस दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे जाणार आहेत. या मार्गासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर येथून 66 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.