प्रत्येकासाठी वाढदिवस हा विशेष असतो आणि जर आपल्या पालक आपले बालपणीचे फोटो पोस्ट करत अभिनंदन केल्यास त्यांचा आनंद काही वेगळाच असतो. बालपणातील ते फोटो पाहिले असता आपण त्या आठवणीत बेधुंद होऊन जातो.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. या दिनी विकीचे वडील श्याम कौशल यांनी त्याला वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
विकीचे वडील आणि स्टंट डायरेक्टर श्याम कौशल यांनी विकीच्या 32 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक क्यूट पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विकी कौशलच्या बालपणीची झलक दिली आहे.
फोटो शेअर करत श्याम कौशल यांनी पोस्ट केले की, “वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. माझे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. आज मला अभिमान आहे की आता मला तुझ्या नावाने ओळखले जाते. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझा अभिमान आहे.’
दरम्यान, विकी कौशलने “मसान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर त्याचा संजू आणि “उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता विकीकडे उधम सिंह, फिल्ड मार्शल हे दोन चित्रपट आहेत.