बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने रविवार, दि. 21 मार्च रोजी बर्थडे सेलिब्रेट खास पद्धतीने साजरा केला. तिने आपल्या बर्थडेनिमित्त चाहत्यांनादेखील एक खास गिफ्ट दिले आहे. तिने आपल्या आगामी चित्रपटाची अनाउंसमेंट केली आहे. राणी मुखर्जीच्या आगामी चित्रपटाचे नाव “मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ असे आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर करणार आहेत. याचे शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटाकडून राणी मुखर्जीला खूप अपेक्षा आहेत. चाहत्यांना आशा होती की, राणी मुखर्जी आपल्या वाढदिवसानिमित्त “मर्दानी 3’बाबत कोणती तरी अनाउंसमेंट करेल. कारण या चित्रपटाच्या सिक्वलसाठी चाहते खूपच एक्साइटेड आहेत.
दरम्यान, राणीच्या “मर्दानी’ आणि “मर्दानी 2′ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. या चित्रपटांतील राणी मुखर्जीचा परफॉर्मन्स चाहत्यांना खूपच आवडला होता. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास राणी मुखर्जी “बंटी और बबली 2’मध्ये झळकणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.