“हॅपी बर्थडे’ मधील रोलसाठी अनुपम खेर यांना विशेष पुरस्कार

अनुपम खेर यांनी गेली 5 दशके अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काही हॉलीवूड मधील सिनेमे आणि टीव्ही कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे. “हॅपी बर्थडे’ या शॉर्ट फिल्ममध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन अलीकडेच गौरवले आहे.

“हॅपी बर्थडे’ने अनुपम खेर यांच्या पुरस्काराबरोबरच सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देखील मिळवला आहे. प्रसाद कदम यांनी या शॉर्ट फिल्मचे डायरेक्‍शन केले आहे. अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्‍त आहना कुमारदेखील यामध्ये लीड रोलमध्ये आहे. हे दोघेही यापूर्वी “ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये एकत्र होते.

न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलने आपल्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडले याबद्दल अनुपम खेर यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. या पुरस्काराचे सर्व श्रेय “हॅपी बर्थडे’ ची सर्व टीम, सहकलाकार अहना कुमार, दिग्दर्शक प्रसाद कदम, कथालेखक, निर्माते आदी सर्वांना असल्याचे अनुपम खेर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.