इंग्लंड संघाचे आयसीसीकडून खास अभिनंदन

एक हजार कसोटी सामने खेळण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) इंग्लंडचे अभिनंदन केले आहे. जगातील समस्त क्रिकेट परिवाराच्या वतीने एक हजार कसोटी सामने खेळण्याचा मान मिळविल्याबद्दल मी इंग्लंडचे खास अभिनंदन करतो, असे सांगून आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले की, हा मान मिळविणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे, यातच सारे काही आले.

इंग्लंडची कामगिरी जागतिक क्रिकेटसाठी नेहमीच दिशादर्शक ठरली आहे. भविष्यातही इंग्लंड संघ जगातील सर्व क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल आणि मार्गदर्शक ठरेल अशी कामगिरी करीत राहील, असा मला विश्‍वास वाटतो. एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट हे झटपट क्रिकेटचे नवे प्रकार कितीही आकर्षक आणि लोकप्रिय ठरले, तरी जगातील सर्वाधिक जुना आणि पारंपरिक असा कसोटी क्रिकेट हा प्रकार जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंड संघ मोलाची कामगिरी बजावेल, अशी मला आशा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)