#HappyBirthdayMSD : भारतीय क्रिकेटला धोनीने दिला नवा चेहरा

-स्वप्निल हजारे

भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस. झारखंडमधील रांची शहरात 7 जुलै 1981 ला धोनीचा जन्म झाला. धोनी आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त धोनीवर त्याचे चाहते आणि इतर क्रिकेट खेळाडूंकडून वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

धोनीच्या कारकिर्दीबदल बोलायचे झाले तर अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. धोनीनेच भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आणले होते. महेंद्रसिंग धोनी याने 500 सामन्यांत 780 फलंदाजाना बाद केलं आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. धोनीच्या नावावर सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही असून त्याने आतापर्यंत 178 स्टंपिंग्स केले आहेत.

सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक शतके ठोकली आहेत. धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 27 कसोटी विजय मिळवले आहेत.जगात 3 कर्णधारांनी 100 पेक्षा जास्त एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला आहे, त्यामध्ये धोनीचा तिसरा क्रमांक लागतो.

धोनी पहिला असा खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळा आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला. धोनीबदल सांगायचे झाले तर, तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय विश्‍वचषक (2011), टी-20 विश्‍वचषक (2007) या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. तसेच त्याने 2007 मध्ये भारतास चॅंपियन चषक स्पर्धेतही अजिंक्‍यपद मिळवून दिले आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीनवेळा विजेतेपद पटकावलं आहे.

धोनीला 2009 मध्ये क्रिकेटमधील उल्लेखनीय कार्यासाठी भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. 2007-08चा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारही त्याला मिळाला होता. 2018मध्ये धोनीला पद्मभुषण पुरस्कार बहाल करण्यात आला.

त्यामुळेच धोनीची अतिशय परिपूर्ण खेळाडू अशी ओळख आहे. त्याने भारतीय क्रिकेट क्षेत्रास प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे. केवळ भारतीय नव्हे तर जगातील अब्जावधी चाहत्यांच्या मुखी सतत धोनी याचेच नाव असते. महेंद्रसिंग धोनी याने भारतीय क्रिकेटला नवा चेहरा दिला आहे.

क्रिकेटजगतात धोनी याच्यासारखा महान यष्टीरक्षक होणार नाही. त्याची निरीक्षणशैली खूपच कौतुकास्पद असते. एखाद्या फलंदाजाला यष्टीचीत करताना त्याची शैली अतुलनीयच आहे. एखाद्या निर्णयाबाबत तिसऱ्या पंचाकडे दाद मागताना त्याच्याइतका आत्मविश्‍वास अन्य कोणत्याच खेळाडूकडे  अद्याप पाहिला नाही.

कसोटी क्रिकेटमधून धोनीने 2014 मध्ये निवृत्ती घेतली. त्याआधी त्याने 90 सामन्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4 हजार 876 धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 350 सामन्यात 10 हजार 773 धावा केल्या असून यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारात त्याने 98 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1 हजार 617 धावा केल्या आहेत.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमधून धोनीने 2014 मध्ये निवृत्ती घेतली आहे. इतर क्रिकेट प्रकाराबदल सांगायच झालं तर गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले असले तरीही त्याच्याकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे. तो संघात निश्‍चितच पुनरागमन करु शकतो, असा विश्वास त्याच्यां चाहत्यासह अनेक खेळाडूंना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.