तयारी जाेरात….कराेना लस वाहतुकीसाठी विमानळावर विशेष व्यवस्था

अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे केली जाणार सुपूर्त

पुणे – मालवाहतूक व विस्तारीकरणाच्या योजनेसाठी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाच्या ताब्यातील अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्त करण्यास मंगळवारी संरक्षण मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

 

 

करोनारोधक लसीची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमार्फत निर्मिती होत आहे. ही लस देशभरात तसेच परदेशात जलदगतीने पाठवण्यासाठी लोहगाव विमानतळावर खास सुविधा निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अडीच एकर जागेची तातडीने गरज असल्याचा मुद्दा बापट यांनी या बैठकीत उपस्थित केला. दिल्ली येथे खासदार बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार या बैठकीस उपस्थित होते.

 

 

वायुसेनेच्या अडीच एकर जागेवर बांधकाम करण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे संरक्षण मंत्रालयाला केली आहे. त्या ठिकाणच्या नियोजित टर्मिनलचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे. यासाठी ही परवानगी आवश्यक आहे. याकडे लक्ष वेधून एस्टिमेट कमिटीच्या मागील बैठकीत हा विषय चर्चेत आला होता.

 

 

लोहगाव विमानतळावर कार्गोसेंटर नाही. त्यासाठी जागाही नाही. हवाई दलाच्या व प्राधिकरणाच्या अपुऱ्या जागेवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे माल वाहतुकीवर मर्यादा येतात. चंदिगढ येथील एका इमारतीच्याबदल्यात लोहगाव विमानतळावरील अडीच एकर जागा विमातळ प्राधिकरणास देण्यास हवाईदलाने या चर्चेदरम्यान हिरवा कंदील दाखविला. चंदिगढ येथील जागा शिल्लक आहे. ती मिळावी, अशी विचारणा हवाई दलाने केली.

 

कारण, लडाख-लेह या परिसरात जवानांची ने-आण करण्यासाठी त्यांची उतरण्याची सोय करण्यासाठी ही जागा त्यांना उपयुक्त आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार बापट यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.