हायकोर्टाचे पालिकेला “खडे’ बोल

-खड्यांची सवय झाली आहे
-मुंबईकर पालीकेचा निष्काळजीपणा सहन करतील

मुंबई – शहरातील रस्ते, फूटपाथवीरल खड्ड्यांच्याबाबतीत मुंबईकरांकडे मोठ्या प्रमाणात सहनशिलता आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ते मान्सूनमध्ये मुंबई महानगरपालीकेची निष्काळजीपणा निमुटपणे सहन करतील, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेला “खडे’बोल सुनावले. मुंबई शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटाकुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासुनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात शहरातील रस्ते, फूटपाथ खड्‌डेमुक्त केले जातील, अशी ग्वाही देणार पालिकेच्या न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

खड्ड्यांच्या संदर्भात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पालिकेच्या प्रतिज्ञापत्रज्ञवर नाराजी व्यक्त केली. याबाबत वारंवार आदेश देऊनही पालिका प्रशासनाने मॉन्सून दरम्यानच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कामे केली नाहीत याची स्पष्ट कबुलीच आहे.

सध्या मॉन्सूनपूर्व काळ सुरू असून लवकरच मॉन्सून दाखल होईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते यासारखी महत्त्वाची काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. पालिका प्रशासनाला या सर्व समस्यांची पूर्ण जाणीव आहे. त्यासाठी काय करायला हवे हे जसे त्यांना माहित आहे, तसे मुंबईकरांमध्ये सर्व गोष्टी सहन करण्याची ताकदही खूप मोठी आहे. हेही माहित आहे. त्यामुळे दरवेळी पालीकेकडून त्याचा गैरफायदा घेतला जातो, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here