मुख्यमंत्र्यांच बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरच आवताण- शरद पवार  

रत्नागिरी: शरद पवार यांनी काल दापोली येथे एसटी कामगार संघटनेच्या ५५व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना कामगारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी, सरकारकडून एसटी कामगारांची गळचेपी सुरू आहे. एसटी कामगार जर भडकला तर सरकारला पळता भुई थोडी होईल. आम्ही एसटी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू व अन्यायाविरुद्ध लढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

शरद पवार म्हणाले, एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग्य देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशी अनेक आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र एकही पूर्ण केलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरच आवताण असल्याची मिश्किल टीका शरद पवार यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)