बॉलीवूडचे बीग बी अर्थात ‘अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी फोटोला “बोलो कौन है कौन ? नाड़ा जिसका दिखे, वही है छोटा पतला DON” असं गंमतीशीर कॅप्शन देखील दिलं आहे. बच्चन यांचा हा फोटो त्यांच्या कॉलेज जीवनातील आहे. 1957 शेरवुड कॉलेज (नैनीताल) या भागातील त्यांचा हा फोटो आहे.
T 3168 –
लोग कहने लगे , picture छाप दी , बोलो कौन है कौन ?
नाड़ा जिसका दिखे , वही है छोटा पतला DON 🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/B2djN6oQAd— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 19, 2019
अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमधील 50 वर्षांची कारकिर्द नुकतीच पूर्ण केली आहे. 50 वर्षांपूर्वी “सात हिंदुस्थानी’ हा अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा असून, 15 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. बच्चन यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे.