जेद्दा (सौदी अरब) : रियाल माद्रिदने सौदी अरबमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये एटलेटिको माद्रिदचा ४-१ असा पराभव करत ११ व्या स्पॅनिश सुपर कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गोलरक्षक थिबोट कोर्टिसने विशेष कामगिरी करत शानदार बचाव करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
🏁 FP: @realmadrid 0-0 @Atleti
⚽ Penaltis: 4-1
🏆 ¡CAMPEONES!#RMSuperCopa | #Supercampeones pic.twitter.com/9Fg8LSEuBf— Real Madrid C.F. (@realmadrid) January 12, 2020
अंतिम सामन्यात गोलशून्य बरोबरी राहिली. थिबोटने पेनल्टी शूटआऊटमध्ये थाॅमस पारटेची पेनल्टी रोखली. त्याआधी साऊल निगुएजचा फटका गोलपोस्टवर आदळला. त्यानंतर सर्जियो रामोसने गोल करीत रियाल माद्रिदला यंदाचे पहिलं विजेतेपद मिळवून दिले.
दरम्यान, याआधी उपांत्य फेरीच्या लढतीत रियाल माद्रिदने वेलेंसियाचा ३-१ ने पराभव करत सुपर कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत एटलेटिको माद्रिदने बार्सिलोनावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली होती.