नवी दिल्ली : रियल माद्रिदने वेलेंसियाचा ३-१ ने पराभव करत १६ व्यांदा स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१७ नंतर ते प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत.
The Supercopa de Espana final will either be a Madrid derby or a Clasico 🤤 pic.twitter.com/sDOJTWwkpk
— B/R Football (@brfootball) January 8, 2020
रियल माद्रिद संघाकडून टोनी क्रूजने पूर्वार्धात १५ व्या मिनिटाला आणि इस्कोने ३९ व्या मिनिटाला गोल करत २-० अशा आघाडीवर नेले होते. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात लुका मोदरिचने ६५ व्या मिनिटाला गोल करत ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
🏁 FT: @valenciacf_en 1-3 @realmadriden
⚽ Parejo 90'+2' (p); @ToniKroos 15', @isco_alarcon 39', @lukamodric10 65'#Emirates | #RMSuperCopa pic.twitter.com/f5lmDWE8er— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) January 8, 2020
त्यानंतर अतिरिक्त वेळेत वेलेंसियाकडून डेनियल पेरेजो याने (९०+२) एकमेव गोल केला.
🏆👊 We will take part in the Spanish Super Cup final at 7pm CET on Sunday!#RMSuperCopa | #HalaMadrid pic.twitter.com/GCm6OCz8uE
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) January 9, 2020
रियल माद्रिद संघाने २०१७ साली बार्सिलोना हरवत विजेतेपद पटकावले होते. स्पॅनिश सुपर कप स्पर्धेतील दुसरी सेमीफाइनल बार्सिलोना आणि एटलेटिको माद्रिद यांच्यात होणार आहे. यातील विजेत्या संघाचा रियल माद्रिदसोबत अंतिम सामना होईल.स्पॅनिश सुपर कपचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे.