बार्सिलोना – भारताच्या जेहान दारुवालाने नवीन एफआयए फॉर्म्युला थ्री चॅम्पियनशिपमधील एफ वन ग्रॅंड प्रिक्समध्ये विजय नोंदवत इतिहास नोंदवला. 20 वर्षीय या स्पर्धकाने दुस-या स्थानापासून सुरुवात केली. पण, लॅपदरम्यान झालेल्या अपघाताचा फटका चार गाड्यांना बसला त्यामुळे त्याची एकाग्रता भंग झाली. सुरुवातीच्या वेळी फिनलॅंडच्या निको कारीने आघाडी घेतली. जेहानला मागे टाकले. पुढच्या दोन लॅपमध्ये जेहानने दोघांमधील अंतर 1.5 सेकंदने कमी केले.
पुन्हा एकदा गाडीच्या बचावाचा प्रश्न आला. यावेळी मात्र जेहान हा रिस्टार्ट करण्यासाठी चांगल्या स्थितीत होता. त्यामुळे 2 लॅप्सनंतर हे अंतर 1.5 सेकंद इतके राहिले. यानंतर जेहानने रेसवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवले व रेसमधील सर्वात गतीमान लॅपची नोंद केली. यानंतर जेहानने 2.121 सेकंद वेळेमध्ये अंतिम रेषा पार केली. त्याने एस्टोनियाचा रेसर जुरी विप्सला मागे टाकले व तो दुस-या स्थानी आला. भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदाच एफ वन ग्रॅंड प्रिक्समध्ये वाजविण्यात आले.
संपुर्ण रेसमध्ये मी नियंत्रणात होतो फक्त पहिला रिस्टार्ट वगळता. त्यानंतर मी माझी गती देखील कायम ठेवली.
प्रेमा रेसिंगचा मी आभारी आहे ज्यांनी मला इतकी चांगली कार दिली. मी ओव्हरड्राईव्ह केले नाही पण, शेवटच्या काही लॅप्समध्ये नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. असे माजी आंतरराष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन म्हणाला. नवीन अशा एफआयए एफ थ्री चॅम्पियनशिप ही जी पी थ्री चॅम्पियनशिप व एफआयए एफ थ्री युरोपियन चॅम्पियनशिप यांना एकत्रित करुन तयार करण्यात आली आहे. यामध्ये 30 कार एकमेकांना चांगली टक्कर देतात. उद्योन्मुख स्पर्धकांसाठी हे चांगले व्यासपीठ समजले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून एफ वन संघांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी स्पर्धकांना मिळते.
जेहान दारुवालाने आपल्या कारकिर्दीला वयाच्या 10 व्या वर्षी कार्टिंगपासून सुरुवात केली. त्याने तेव्हापासून भारताची राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप, मलेशियन ज्युनिअर यामाहा कार्टिंग चॅम्पियनशिप, एफआयए सीआयके आशिया पॅसिफिक केएफ थ्री चॅम्पियनशिप व ब्रिटिश सुपरवन राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद मिळवले.