स्पेनमध्ये आज ५५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात या विषाणूचे २० लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर, या विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ४ लाख ८६ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. 

स्पेनमध्ये ५५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू-
गुरुवारी स्पेनमध्ये ५५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, स्पेनमध्ये आतापर्यंत १९ हजार जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे. या बाबत एएफपी या वृतसंस्थने वृत्त दिले आहे.  

पाकिस्तानात तबलिगीच्या ९ जणांना कोरोना-
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ९ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. हे सर्व जण तबलिगी जमातीत  सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात आतापर्यंत ६ हजार ५०६ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. 
 
दक्षिण कोरियात २२ नवे कोरोनाबाधित रुग्ण- 
दक्षिण कोरियात मागील २४ तासांत २२ नवे कोर्णबधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन कोरोना संसर्गाचा आकडा १० हजार ६१३ वर पोहचला आहे. तर, आता पर्यंत २२९ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 
 
चीनने रशियन सीमेवर दिली वैद्यकीय सुविधांना बळकटी
चीनमध्ये कोरोना विषाणूची ४६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.  ज्यात ३४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सध्या विदेशातून आलेल्या नागरिकांमुळे चीनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे चीनने रशियन सीमेवर वैद्यकीय सुविधांना बळकटी दिली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.