अंतराळातील कचरा नष्ट होईल; ‘मिशन शक्ती’बाबत नासाच्या भीतीवर डीआरडीओचा खुलासा

नवी दिल्ली – भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा काही दिवसात नष्ट होईल’, असे डीआरडीओचे चीफ सतीश रेड्डी यांनी म्हटले आहे. अंतराळात निर्माण झालेल्या या कचऱ्यामुळे अंतरिक्षातील कोणत्याही विद्यमान स्पेस मालमत्तेवर समस्या निर्माण होणार नाहीत, अशी ग्वाहीच सतीश रेड्डी यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे काही प्रमाणात यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना सतीश रेड्डी यांनी, खरे तर रडारांनी चाचणीनंतर ताबडतोब कचऱ्याचा हा मलबा नष्ट करण्यात आल्याची माहिती दिली.

भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाल्याचे नासाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर डीआरडीओ कडून हा खुलासा करण्यात आला आहे.भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती.

त्यानंतर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या या चाचणीबाबत भीती व्यक्त केली होती. ‘भारताची मिशन शक्ती ही मोहीम भयानक असून पाडलेल्या उपग्रहाचे 400 तुकडे अंतराळात पसरले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाला आहे’, असे नासाने म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.