जयाप्रदांवर टीका करताना सपा नेते आझम खान यांची जीभ घसरली, म्हणाले…

लखनऊ – रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभेचे उमेदवार आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं आहे.

आझम खान म्हणाले की,”राजकारण इतक्या खालच्या स्तरावर पोहोचलं आहे का? ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणलं. त्यांनी आमच्यावर नको-नको ते आरोप केले. त्यांची वास्तविकता ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्ष लागली. मी 17 दिवसांत ओळखलं की, त्यांची अंतर्वस्त्र खाकी रंगाची आहेत “, तुम्ही त्यांना मतदान करणार का?.

दरम्यान, हे विधान करताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. रामपूर लोकसभा मतदारसंघात जयाप्रदा विरुद्ध आझम खान यांच्यात सामना होत आहे. आझम खान यांच्या या वक्तव्यमुळे उत्तर प्रदेशसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आझम खान यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.

या विधानावरून चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, जर मी दोषी आढळलो तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.