मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोयाबीनला हवा तस हमीभाव मिळत नाही आहे. दरवर्षी हंगाम आला की सोयाबीनचे तीन ते चार हजार रुपयांनी घसरन होते.
आपल्याकडे बाकी सग्गळं ट्रेंड होतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा तिथल्या तिथेच! #दुर्दैवं #सोयाबीन pic.twitter.com/VlOCFbQpRC
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 23, 2021
यातच मागच्या आठवड्यात सोयाबीनची आयात केल्याने देशातील सोयाबीनचा दर अचानक तीन ते चार हजार रुपयांनी घसरले आहेत. सोयबीन काढणाची हंगाम सुरू असताना हे दर पडल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सध्या सोशलवरही #soyabean वापरत पिकाला भाव न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिळून सोशल मीडीयावर ट्रेंड सूरू केला आहे. याला हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद आहे.
याच मुद्यावरून आता अभिनेता हेमंत ढोमेने देखील हा हॅशटॅग वापरत सोयाबीन शेतकऱ्यांबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्याने #soyabean हा आपल्याकडे बाकी सग्गळं ट्रेंड होतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा तिथल्या तिथेच! #दुर्दैवं #सोयाबीन असे कॅप्शन दिले आहे.