#Accident : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

मुंबई –  अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरूख खान यापैकी कुणाकडेही अशी अलिशान व्हॅनिटी व्हॅन नाहीये. अशी व्हॅनिटी व्हॅन दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात असणारा अल्लू अर्जूनकडे आहे. मात्र  या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाल्याची बातमी आली. शनिवारी हैदराबादेत अल्लूच्या व्हॅनिटी व्हॅन फाल्कनला अपघात झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुनची मेकअप टीम रामपचोदवरम येथ्ून परतत असताना हा अपघात झाला. व्हॅनिटी व्हॅनच्या ड्रायव्हरने ब्रेक मारताच मागून येणा-या लॉरीने व्हॅनला जोरदार धडक दिली. सुदैवाने यावेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीमध्ये नव्हता. त्याची मेकअप टीम  मात्र व्हॅनिटीमध्ये होती. या टीममधील सर्वजण सुरक्षित आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

दरम्यान, हि व्हॅन त्याने 2019 साली खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन असे त्याच्या व्हॅनिटीचे नाव आहे. अनेक लक्झरी फिचर्स असणाऱ्या या कारचे एक्सटीरीअर पाहिले तर त्यावर अल्लूने ‘AA’ असं स्वत: चं नाव कोरून घेतलं आहे. ही व्हॅनिटी व्हॅन बेंज चौसीवर तयार केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.