साऊथ सुपरस्टार थालापथी विजयने आई-वडिलांविरुद्धच दाखल केला गुन्हा; नेमकं काय आहे कारण वाचा सविस्तर

नवी दिल्ली :  साऊथ सिनेमातील सुपरस्टार अभिनेता थालापथी विजय याने स्वतःच्याच आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयने वडील एस. ए.चंद्रशेखर आणि आई शोभा यांच्यासह ११ जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. नागरी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता विजयने कोणत्याही लोकांना एकत्र जमवण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची मिटींग घेण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जाऊ नये अशी मागणी केली आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे.

अभिनेता विजय याने राजकारणात यावे अशी त्याच्या वडिलांची म्हणजे एस ए चंद्रशेखर यांची इच्छा होती. त्यासाठी विजयचे वडील चंद्रशेखर यांनी विजय याच्या नावाचा पक्ष रजिस्टर करण्यासाठी पाऊल टाकलं. विजय यांच्या वडिलांनी घोषित केले की, पद्मनाभन पार्टीचे अध्यक्ष आमचे नातेवाईक असतील. शोभा खजिनदार आणि स्वत: विजय यांचे वडील पक्षाचे जनरल सेक्रेटरी राहतील.

आता अभिनेता विजयने जाहीरपणे निवेदन जारी केले असून यात त्याने, “असा कुठलाही पक्ष स्थापन करण्यासाठी माझी सहमती घेण्यात आली नव्हती असे म्हटले आहे. त्यामुळे त्याने आई- वडिलांसोबत ११ जणांविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. जेणेकरून लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि माझ्या नावाचा वापर करून मिटींग करण्यावर बंदी आणावी अशी मागणी विजय याने न्यायालयात केली आहे. यापूर्वी विजय त्याच्या लग्झरी कारच्या टॅक्सच्या बातमीवरुन चर्चेत आला होता.

विजय यांच्यावर आरोप होता की, त्याने मागवलेली कार लंडनहून आणली होती आणि त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स दिला नाही. विजयने २०१३ मध्ये रॉल्स रॉयल कार मागवली होती. मद्रास हायकोर्टाने अभिनेता विजयवर १ लाखाचा दंड आकारला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.